बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(BJP)आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अनेक बैठकांचे आयोजन केलं जाताना पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आज भाजपच्या कोअर कमिटीची मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपच्या अंतर्गत जागावाटपासंदर्भात बैठकीत चर्चा पार पडण्याची शक्यता आहे.
येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 31 डिसेंबर रोजी उमेदवारांच्या अर्जाची छाननी होणार आहे. तर 2 जानेवारी 2026 पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. 3 जानेवारी रोजी चिन्हाचं वाटप होणार आहे.
Summary
भाजप कोअर कमिटीची बैठक
मुंबईत आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होण्याची शक्यता
भाजपच्या अंतर्गत जागावाटपासंदर्भात बैठकीत चर्चा पार पडण्याची शक्यता