थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Nashik BJP ) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे.
निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने भाजपच्याच अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करणाऱ्यांविरोधात आता कारवाई करण्यात आली आहे. नाशिकमध्ये भाजपकडून 54 बंडखोरांची हकालपट्टी करण्यात आली आहे. माजी महापौरांसह 20 माजी नगरसेवकांचा समावेश असून पक्षाची शिस्त मोडल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी दिली.