महाराष्ट्र

भाजपकडून अमल महाडिक यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Published by : Lokshahi News

सतेज औंधकर, कोल्हापूर | विधानपरिषदेच्या कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीसाठी भाजपचे उमेदवार माजी आमदार अमल महाडिक यांनी सोमवारी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.

कोल्हापूर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून अमल महादेवराव महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या अर्ज दाखल करताना अमल महाडिक यांच्या समवेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित सिंह घाटगे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते जयंत पाटील, आमदार प्रकाश आवाडे हे उपस्थित होते. या निवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकासआघाडी म्हणजेच सतेज पाटील विरुद्ध अमोल महाडिक असा सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात