बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( BJP ) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.
याच पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष तयारीला लागले असून आज पुण्याची पहिली भाजपाची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी काल रात्री उशिरा अंतिम करण्यात आल्याची माहिती मिळत असून शंभराहून अधिक नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती मिळत असून मुख्यमंत्री फडणवीस या यादीतील नावांना मान्यता देऊन आज ही यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
महापालिका निवडणुकीसाठी पुण्यात बुधवारी झालेल्या भाजपच्या कोर कमिटी बैठकीत 100 पेक्षा अधिक उमेदवारांची नावे अंतिम करण्यात आली आहेत. या उमेदवारांच्या नावाची यादी घेऊन भाजपचे प्रमुख पदाधिकारी काल मुंबईला गेले होते. अंतिम करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता असून पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील आमदारांच्या तसेच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची चर्चा करून 41 प्रभागातील प्रमुख उमेदवारांनी यादी कोअर कमिटी बैठकीत तयार करण्यात आली होती.
Summary
पुण्याची भाजपाची आज यादी जाहीर होण्याची शक्यता
पुणे महापालिकेच्या निवडणूकीसाठी भाजपाची पहिली यादी काल रात्री उशिरा अंतिम करण्यात आली
शंभराहून अधिक नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती