(Narayan Rane) भाजप नेते खासदार नारायण राणे जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज नारायण राणे यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार राणे जसलोक रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. नारायण राणे यांच्यावर नेमकी कोणती शस्त्रक्रिया केली जाणार आहे याची माहिती अजून मिळालेली नाही आहे.