Krishna Khopde  
महाराष्ट्र

Krishna Khopde : भाजप आमदार कृष्णा खोपडे यांना शिवीगाळ करत धमकीचे फोन

तुकाराम मुंढे यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात येत असून अधिवेशनात भाजप आमदार कृष्णा खोपडे याबाबत अधिवेशनात लक्षवेधी मांडणार असल्याची माहिती मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Krishna Khopde) तुकाराम मुंढे यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात येत असून अधिवेशनात भाजप आमदार कृष्णा खोपडे याबाबत अधिवेशनात लक्षवेधी मांडणार असल्याची माहिती मिळत आहे.

भाजप आमदार हिवाळी अधिवेशनात आयएएस तुकाराम मुंढे यांच्या विरोधातील दोन जुन्या गंभीर प्रकरणांना पुन्हा उजाळा देत त्यांच्या निलंबनाची विशेष लक्षवेधी सूचना मांडणार असून खोपडे यांनी दावा केली आहे की, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त असताना नियमबाह्य पद्धतीने स्मार्ट सिटी प्रकल्पाचा प्रभार घेतला तसेच शासनाकडून सीईओ म्हणून औपचारिक नेमणूक नव्हती तरी अधिकार नसताना स्मार्ट सिटीवर स्वतः नियंत्रण घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

तसेच महिला अधिकाऱ्यांना दमदाटी आणि वर्तणुकीबाबत तक्रार करण्यात आली असून त्या वेळी महाविकास आघाडी सरकार असल्याने कारवाई करण्यात आली नसल्याचा भाजपने आरोप केला आहे.

याच पार्श्वभूमीवर आता भाजप आमदार कृष्णा खोपडे यांना शिवीगाळ करत धमकीचे फोन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धमकीचे फोन आल्याने त्यांनी मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि सीताबर्डी पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. तुकाराम मुंडेंची निलंबनाची मागणी का करत आहात असा सवाल करत दोघांनी फोन करत धमकी दिल्याची खोपडे यांनी सांगितले आहे.

Summery

  • भाजप आमदार कृष्णा खोपडे यांना धमकीचे फोन

  • अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धमकीचे फोन

  • धमकीचे फोन आल्याने त्यांनी मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि सीताबर्डी पोलिस ठाण्यात तक्रार

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा