महाराष्ट्र

भाजपा खासदाराच्या अंगरक्षकाने महिलेवर ताणले रिव्हॉल्वर

Published by : Lokshahi News

उदय चक्रधर, भंडारा | भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनिल मेंढे यांचे अंगरक्षक (बॉडीगार्ड) असलेल्या एका पोलीस शिपायाने आपल्या शेजारी राहणाऱ्या महिलेवर बंदूक ताणल्याची खळबळजनक घटना भंडारा शहरातील तकीया वॉर्डात घडली। एवढेच नाही तर महिलेशी वाद घातल्यानंतर घरी परतल्यानंतर रागाच्या भरात शिपायाने हवेत दोन फैरी झाडल्याची घटना घडली.

सेवक तेजराम खंडाते असे पोलीस शिपायाचे नाव असून तो भंडारा गोंदियाचे खासदार यांचा अंगरक्षक म्हणून कार्यरत आहे.तकीया वॉर्डातील शांतीनगर येथे राहणारे रोशन दहेलकर यांच्या घरी अंगरक्षक सेवक खंडाते मद्यधुंद अवस्थेत पोहचला. त्यावेळी घरी असलेल्या पत्नी कुमुदिनी दहेलकर यांच्यावर त्याने रिव्हॉल्वर ताणली.त्याचवेळी सेवकची आई आणि पत्नी तेथे आली, त्यांनी त्याला घरी नेले. परंतु घरी परतताच रागाच्या भरात त्याने हवेत दोन राऊंड फायर केले. या संबंधित अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून या संदर्भात अधिक तपास सुरू आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली