Jitendra Awhad and Yashomati Thakur  team lokshahi
महाराष्ट्र

Rajya Sabha Election : जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांच्या मतदानावर भाजपचा आक्षेप

Published by : Shweta Chavan-Zagade

सकाळी नऊ वाजल्यापासून राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांचे मत बाद ठरवले जावे, अशी मागणी भाजपने (BJP) केली आहे. ही दोन्ही मतं बाद ठरल्यास महाविकास आघाडी अडचणीत येऊ शकते. जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांनी मत पत्रिका हातामध्ये नेऊन दिल्यामुळे भाजपकडून (BJP) आक्षेप घेण्यात आला आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आमदारांनी मतदान केलं आहे. आतापर्यंत २५० पेक्षा जास्त आमदारांचे मतदान झाले आहेत. राज्यसभेच्या ६ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये शिवसेनेचे संजय पवार यांची उमेदवारी धोक्यात आहे. निवडणुकीत मतदान करताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांच्या मतावर भाजप आमदार पराग अळवणी यांनी आक्षेप घेत मत ग्राह्य धरु नये अशी मागणी केली आहे.

मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हातात मतपत्रिका दिली आहे. तर मंत्री यशोमती ठाकूर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हातात मत पत्रिका दिली आहे. दोन्ही सदस्य मंत्री आहेत. तसेच अशा प्रकारे मतदान करण्याची पद्धत नाही. पक्ष प्रतोदांना आपण कोणाला मतदान करतो हे दाखवण्याची पद्धत आहे. परंतु मत पत्रिका कोणाच्या हातात देण्याची पद्धत नाही. त्यामुळे भाजपचे आमदार पराग अळवणी यांनी आक्षेप घेतला आहे.

मतदान मात्र ग्राह्यच

आमदार पराग अळवणी यांनी आक्षेप घेतल्यामुळे मतदान थांबवण्यात आले होते. यामध्ये नियमांची पडताळणी करण्यात येत आहे. दरम्यान दोन्ही नेत्यांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. परंतु भाजपने आक्षेप घेतल्यामुळे मत बाद करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. जर ही दोन मते बाद झाली तर महाविकास आघाडीचे गणित बदलू शकते. शिवसेनेची जागा आहे ती धोक्यात येऊ शकते. परंतु नियमानुसार मतदान ग्राह्य धरण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 IND vs PAK Live Update : पाकिस्तानची टोळी 127 धावांवर बाद, भारतासमोर 128 धावांचे आव्हान

PM Narendra Modi On Congress : “मी शिवाचा भक्त, विषही प्राशन करेन” पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींंना दागिने खरेदी करण्यासाठी उत्तम योग, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार