बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(BJP - Shivsena) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर निवडणुकीसाठी राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
यातच आता भाजप-शिवसेनेच्या 200हून अधिक जागांचा तिढा सुटल्याची माहिती मिळत आहे. आता उरलेल्या 20 ते 25 जागांसाठी पुन्हा खलबते होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून अंतिम निर्णय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यात होणार आहे. शिवसेनेच्या वाट्याला सुमारे 70 जागा, मात्र शिवसेनेकडून 100 प्लस जागांची मागणी करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.
Summary
भाजप-शिवसेनेच्या 200हून अधिक जागांचा तिढा सुटला
आता उरलेल्या 20 ते 25 जागांसाठी पुन्हा खलबतं होण्याची शक्यता
अंतिम निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री घेणार