थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Ichalkaranji) 29 महानगरपालिकांमध्ये मतदान आज होणार आहे. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून असून संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मतदानाला सुरूवात झाली असून अनेक मतदान केंद्रावर गोंधळ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
यातच इचलकरंजीत भाजप आणि ठाकरेसेनेत वाद झाल्याचे पाहायला मिळत असून इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाचमध्ये एका हॉलमध्ये भाजप उमेदवार मतदारांना पैसे वाटप करत होता. शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी जाऊन पैसे वाटपाबद्दल जाब विचारला असता एकच गोंधळ निर्माण झाला.
यावेळी दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की देखील झाली. काही काळ परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी एका हॉलमध्ये शेकडो मतदारांना ठेवण्यात आले होते. या नागरिकांनाच पैसे दिल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
Summary
इचलकरंजीत भाजप-ठाकरेसेनेत राडा
पैसे वाटण्यावरून कार्यकर्त्यांमध्ये वाद
'भाजप उमेदवाराकडून मतदारांना पैसे वाटप'