विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत असतात. यातच आता भाजपचं विधानसभा विजय संकल्प अभियान असणार आहे.
मुंबईच्या दादरमधील वसंत स्मृती भवनात संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे. भाजप अनुसूचित जाती मोर्चाकडून दादर वसंत स्मृती येथे सकाळी 10 वाजता संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
भाजपचे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, किरेन रिजुजू, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, व्ही. सतीश हे या संमेलनातून मार्गदर्शन करणार आहेत.
तसेच या संमेलनात भाजप प्रदेश मोर्चा पदाधिकारी, अनुसुचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष, महामंत्री, विधानसभा समन्वयक, सहसमन्वयक सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे.