mahavikas aghadi vs bjp Team Lokshahi
महाराष्ट्र

Vidhan Parishad Election : महाविकास आघाडी विरुध्द भाजप सामना अटळ

कॉंग्रेसने कसली कंबर; माघार घेण्यास नकार

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी उडणार आहे. विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात महाविकास आघाडीकडून 6 तर भाजपकडून 5 उमेदवार रिंगणात आहेत. विधान परिषदेच्या 20 तारखेला 10 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत पुन्हा महाविकास आघाडी विरुद्ध भाजप सामना रंगणार आहे.

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली होती तर राष्ट्रवादीकडून शिवाजीराव गर्जे यांनी डमी अर्ज भरला होता. तर कॉंग्रेसनेही चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी घोषित केली होती. परंतु, शेवटच्या क्षणी भाजप व राष्ट्रवादीने अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची आशा होती. परंतु, कॉंग्रेसने उमेदवारी मागे घेण्यास नकार दिला आहे. यामुळे विधानसभेत भाजप विरुध्द महाविकास आघाडी म्हणजेच थेट कॉंग्रेस असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी आज अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर राहीले आहेत. राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ देशभरात ईडी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर विधानसभेत कॉंग्रेस भाजपला आव्हान देण्याच्या तयारीत आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार

भाजप : प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारती, उमा खापरे, प्रशांत लाड

राष्ट्रवादी कॉंग्रेस : एकनाथ खडसे, रामराजे निंबाळकर

शिवसेना : सचिन अहिर आणि आमशा पाडवी

कॉंग्रेस : भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा