थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Navi Mumbai BJP ) मुंबई महानगर पालिका निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.29 महानगरपालिकांमध्ये भाजपा-शिवसेनेच्या महायुतीने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत.
पालिका निवडणुकीचा निकाल हाती आला असून यामध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. महापालिका निवडणुकीत महायुतीने बाजी मारली असून 29 पैकी 24 पालिकांवर महायुतीची सत्ता आल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे-पवार आणि काँग्रेसचा धुव्वा उडाला आहे. भाजपने जवळपास ९ महापालिकांमध्ये स्वबळावर सत्ता गाठली.
यासोबतच नवी मुंबई पालिका निवडणुकीत भाजपचा झंझावात पाहायला मिळाला असून एकनाथ शिंदेंना धक्का बसला आहे. नवी मुंबईत भाजपचा 65 जागांवर विजय झाला असून शिंदेंची शिवसेना नवी मुंबईत 42 जागांवर विजयी झाली आहे.
Summary
एकनाथ शिंदेंना धक्का देत गणेश नाईकच ठरले नवी मुंबईचे 'ठाणे'दार
नवी मुंबईत भाजपचा 65 जागांवर विजय
शिंदेंची शिवसेना नवी मुंबईत 42 जागांवर विजयी