महाराष्ट्र

नवाब मलिकांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे भाजपा कार्यकर्त्यांनी केले दहन

Published by : Lokshahi News

खालेद नाज, परभणी | अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी 1993 बॉम्ब स्फोटातील आरोपीकडून जमीन विकत घेतल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या प्रकरणावरून भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून या घटनेच्या निषेधार्थ परभणीत भाजपा कार्यकर्त्यानी नवाब मलिकांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून पुतळ्याचे दहन केले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे पत्रकार परिषद घेत राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा परभणीचे पालकमंत्री नवाब मालिकांचे अंडरवर्ल्ड सोबत संबंध असल्याचे आरोप केले. तसेच नवाब मालिकांचे 1993 बॉम्ब स्फोटातील दोषी असलेला सरदार शाह वली खान व सलीम पटेल यांच्यात असलेले व्यवहारीक संबंध देशद्रोह्या सोबत असल्याच्या निषेधार्थ परभणीत भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते. यावेळी मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपीकडून जमीन विकत घेतल्याच्या निषेधार्थ परभणीत भाजपा कार्यकर्त्यानी नवाब मलिकांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून पुतळ्याचे दहन केले . तसेच नवाब मलिक जर परभणी दौऱ्यावर आल्यावर त्यांना काळ फासले जाईल अशी चेतावनी भाजप कार्यकर्त्यानी दिली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांचीही हजेरी

Sudhir Mungantiwar : 'हिंदी शिकणं अवमान, पण इंग्रजी शिकणं अभिमान, असं कसं?'; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी