महाराष्ट्र

भाजप कार्यकर्त्यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊतांना दाखवले काळे झेंडे

Published by : Lokshahi News

जालना जिल्ह्यात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या ताफ्याला भाजप कार्यकर्त्यानी काळे झेंडे दाखवल्याचा प्रकार घडला आहे. भाजप नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या कार्यकर्त्यांनी ताफा अडवल्याची माहिती आहे.

जिल्ह्यातील नेर गावातील १३३ केव्ही विज केंद्र आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उटवद येथे हलवले असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. आज ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते उटवद येथे या उपकेंद्राचं उद्घाटन करण्यात आलं.त्यामुळे नेर येथील उपकेंद्र कायम न ठेवता ते ऊटवद येथे का हलवलं असा सवाल उपस्थित करत बबनराव लोणीकर समर्थकांनी राजेश टोपे यांचा ताफा समजून ऊर्जामंत्री राऊत यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत राजेश टोपे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

GST मध्ये मोठे बदल ; आता 5 टक्के आणि 18 टक्के असे दोन टप्पे

Latest Marathi News Update live : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेवर 2 विशेष गाड्या धावणार; प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Atal Setu : अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी

Imran Khan : इम्रान खान यांना मोठा दिलासा; जामीन मंजूर