BMC News team lokshahi
महाराष्ट्र

मोठी बातमी : मुंबईसह 14 पालिकांची आरक्षण सोडत जाहीर

Published by : Team Lokshahi

राज्य निवडणूक आयोगानं (State Election Commission) मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकांचा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे मुंबई महापालिकेसह (Mumbai) 14 महापालिकांसाठी ही आरक्षण सोडत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भातील (OBC Political Reservation) निर्णयानंतर आयोगाकडून निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.

मुंबई, नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली आणि ठाणे महापालिकेसाठी येत्या31 मे 2022 रोजी आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. अनुसुचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्याकरिता सोडत काढण्यासाठी सोबतच्या परिशिष्ट-ड (मराठी)व परिशिष्ट-इ इंग्रजीमधील नमुन्यात जाहीर नोटीस प्रसिद्ध करणे. त्याआधी स्थानिक वर्तमानपत्रं, वेबसाईट, सूचना फलक इत्यादी 27 मेपर्यंत प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर, अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण महिला यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी सोडत काढणे यासाठी 31 मे तारीख देण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेसाठी कसा असेल कार्यक्रम?

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीसंदर्भातील पहिली नोटीस 27 मे रोजी प्रसिद्ध होईल. 31 मे रोजी अनुसूचित जाती (महिला) आणि अनुसूचित जमाती (महिला) 1आणि सर्वसाधारण महिला आरक्षण सोडत काढली जाईल. ही आरक्षण सोडत 1 जून रोजी वृत्तपत्रात प्रसिद्ध करुन हरकती मागवल्या जातील. आरक्षण सोडतीवरील हरकती आणि सूचना 1 ते 6 जून दरम्यान स्वीकारल्या जातील. अंतिम आरक्षण सोडत १३ जून रोजी राजपत्रात प्रसिद्ध केली जाईल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप

Saamana Editorial : '...ते अर्थात ‘ठाकरे भाऊ' विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सामनातून नेमकं काय म्हटलंय?