महाराष्ट्र

BMC Budget 2022 : सत्ताधार्‍यांचे मराठी प्रेम बेगडी; भाजपची टीका

Published by : Lokshahi News

सत्ताधार्‍यांचे मराठी प्रेम बेगडी असून महापालिकेच्या शैक्षणिक बजेटमध्ये मुंबईतील मराठी शाळांकरिता भरीव तरतूदच नसल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे शिक्षण समिती सदस्य पंकज यादव यांनी केली आहे.
मुंबई महापालिकेचा 2022-2023 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प (bmc budget) सादर करण्यात आला आहे. महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal singh chahal) यांनी 45 हजार 949 कोटींचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. या अर्थसंकल्पावर आता भाजपकडून टीका होत आहे.

मुंबई महापालिकेतील मराठी शाळांमधील विद्यार्थी संख्या गेल्या दहा वर्षात १,०२,२१४ वरून ३३,११४ एवढी घसरलेली आहे. मागील १० वर्षात मराठी माध्यमांच्या ४१३ शाळांपैकी फक्त २८० शाळा सुरु आहेत. मुंबई महापालिकेत सलग २५ वर्षे शिवसेनेची सत्ता असताना देखील मराठी भाषेची ही दुरावस्था झाली आहे. आता तर शिवसेनेने मराठी शाळा बंद करण्याचा चंगच  बांधला आहे की काय? अशी शंका भारतीय जनता पक्षाचे शिक्षण समिती सदस्य पंकज यादव यांनी व्यक्त केली.

मराठी शाळा वाचवण्यासाठी अर्थसंकल्पात कोणतीही आर्थिक तरतूद नाही याचा अर्थ मायबोली मराठीला डावलून इंग्रजीसाठी पायघड्या घालण्याचा प्रकार म्हणजे मायबोली मराठीचा अवमान आहे. मराठी शाळेतील पटसंख्या वाढविण्यासाठी कोणतेही नियोजन असल्याचे दिसत नाही. मुंबई पब्लिक स्कूल नावातून महानगरपालिका शब्दसुद्धा वगळला आहे.

आजकाल ऑनलाइन शिक्षणाचा गवगवा केला जात आहे. मात्र, गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना ते परवडणार आहे का? याचा विचार अर्थसंकल्पात करणे गरजेचे होते. चारकोप, मालवणी, माहुल, मानखुर्द, सँडहर्स्ट रोड या ठिकाणी शाळा नाहीयेत मात्र, नव्या शाळा उभारणीसाठी कुठलीही भरीव तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. संगीत शिक्षणात सुफीयना अंदाजचा समावेश करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी मात्र जाणीवपूर्वक शास्त्रीय संगीताकडे दुर्लक्ष केले असल्याची टीका शिक्षण समिती यादव यांनी केली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा