थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Navi Mumbai ) मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी–चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली–मिरज–कुपवाड, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड–वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर, उल्हासनगर, कल्याण–डोंबिवली, भिवंडी–निजामपूर, मीरा–भाईंदर, वसई–विरार, पनवेल या 29 महानगरपालिकांमध्ये मतदान होणार आहे.
सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून असून संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मतदानाला सुरूवात झाली असून अनेक ठिकाणी गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता नवी मुंबईत अनेक ठिकाणी बोगस मतदान झाल्याचा आरोप उमेदवार शिवम पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे.
प्रभाग क्रमांक 7 येथे मतदान करण्यासाठी येणाऱ्या लोकांच्या बोटावर शाईच लावली जात नसल्याचं व्हिडिओच्या माध्यमातून शिवम पाटील यांनी स्वतः दाखवला आहे. त्यामुळे मतदान करण्यासाठी जे मतदार येतात ते पुन्हा एकदा मतदान केंद्रावर येण्याची शक्यता असल्याची भीती देखील त्यांनी बोलून दाखवली आहे.
Summary
नवी मुंबईत अनेक ठिकाणी बोगस मतदान
उमेदवार शिवम पाटील यांनी केला आरोप
प्रभाग क्र.7 मध्ये मतदारांच्या हातावर शाई नाही