महाराष्ट्र

पिंपरी शहरात बॉम्ब सापडल्याची घटना

Published by : Lokshahi News

सुशांत डुंबरे । पिंपरी चिंचवडच्या मध्य वस्तीत असलेल्या कोहिनुर इमारतीच्या परिसरात खोदकाम सुरू असताना एक बॉम्ब सापडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पिंपरी चिंचवड शहरातील मध्य वस्तीत असलेल्या कोहिनूर इमारतीच्या परिसरात खोदकाम सुरु असताना एक बॉम्ब सापडलाय. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. दुपारी 10 ते 12 च्या दरम्यान पिंपरी मधील कोहिनूर सोसायटीच्या आवारात खोदकाम सुरु असताना जेसीबी चालकाला हा बॉम्ब आढळून आला…पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हा शेल बॉम्ब असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. हा बॉम्ब जिवंत आहे की नाही या बाबत बॉम्बनाशक पथक शोध घेत आहे.

पुण्याहून बॉम्बनाशक पथक पिंपरी चिंचवडला आलं. हे पथक येतातच ज्या ठिकाणी बाँब आढळून आला त्या ठिकाणी पाहणी करत तो बाँब सील करून तपासणी साठी घेऊन गेले आहेत.हा शेल बॉम्ब असल्याची माहिती पिंपरी पोलिसांनी दिलीय.हा बॉम्ब जिवंत आहे की नाही या बाबत बॉम्ब नाशक पथक शोध घेत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची आज पत्रकार परिषद

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार