महाराष्ट्र

बूस्टर डोससाठी केंद्र सरकारकडून कॉकटेल लशीच्या पर्यायाची चाचपणी

Published by : Lokshahi News

पंतप्रधान मोदींनी 10 जानेवारीपासून भारतात बुस्टर डोस देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. तेव्हापासूनच बुस्टर डोसबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहेत. बुस्टर डोस किती दिला जाणार? कोणत्या लसीचा दिला जाणार? यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत . आरोग्य कर्मचारी आणि 60 वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना 10 जानेवारीपासून प्रिकॉशन डोस देण्यात येणार आहे. पण लस देताना सरकार एक खास प्लान राबवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एखाद्या व्यक्तीला लसीचे पहिले दोन डोस एका वॅक्सिनचे देण्यात आले असतील तर तिसरा म्हणजेच, बुस्टर डोस त्याच वॅक्सिनचा देण्यात येणार नाही. तो दुसऱ्या वॅक्सिनचा देण्यात येणार आहे किंवा त्यासाठी कॉकटेल लशीच्या पर्यायाची चाचपणी करण्यात येत आहे.

10 जानेवारीपासून भारतात बुस्टर डोस, अर्थात कोरोना प्रतिबंधक लशीच्या तिसऱ्या डोसचं वितरण सुरु होणार आहे. मात्र तुम्ही ज्या लशीचे दोन डोस घेतले आहेत. तीच लस बुस्टर डोस म्हणून दिली जाण्याची शक्यता कमी आहे. कारण बूस्टर डोससाठी केंद्र सरकारकडून कॉकटेल लशीच्या पर्यायाची चाचपणी केली जात आहे. कॉकटेल अर्थात दोन वेगवेगळ्या लशींचे डोस अधिक परिणामकारक असल्याचं एका अभ्यासानंतर समोर आलं आहे. या संदर्भातील अहवाल अजून प्रसिद्ध व्हायचा आहे.

एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, "जर एखाद्या व्यक्तीला त्यानं आधी घेतलेल्याच लसीचा बुस्टर डोस दिला तर तो तेवढा परिणामकारक ठरत नाही. पण कॉकटेल अर्थात दोन वेगवेगळ्या लशींचे डोस अधिक परिणामकारक असल्याचं अभ्यासात दिसून आलं आहे"

बुस्टर डोसबाबत मोदींची मोठी घोषणा

आरोग्य कर्मचारी अर्थात हेल्थ केअर वर्कर्स आणि फ्रंटलाईन वर्कर्सना दोन लसीकरणांनंतर बूस्टर डोसही देण्याची सुरुवात करण्यात येणार असल्याचं मोदीनी सांगितलं आहे. . याची सुरुवात 10 जानेवारी, 2022 पासून होणार आहे. त्यानंतर तिसरी घोषणा म्हणजे 60 वर्षांवरील सामान्य नागरिकांनाही डॉक्टरांच्या सल्ल्याने बूस्टर डोस देण्याची सुरुवात करणार असल्याचं यावेळीन मोदींनी सांगितलं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chhatrapati Sambhajinagar : विठ्ठल-रुक्मिणीच्या पदस्पर्शाने पावन झालेले 'छोटे पंढरपूर'; वाळूजजवळील भाविकांचे श्रद्धास्थान

Pratap Sarnaik : 'अमराठींसाठी मोफत मराठी शिकवणी', मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

Amravati News : अंधश्रद्धेचा कहर! 10 दिवसांच्या चिमुकल्याला गरम विळ्याचे 39 चटके अन्...

Banner In Front Of Sena Bhavan : विजयी मेळाव्यानंतर सेना भवनासमोर झळकले ठाकरे कुटुंबातील दोन पिढ्यांच्या फोटोचे बॅनर