थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(NCP) महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं असून सर्वच राजकीय पक्ष आता तयारीला लागले आहेत. मुंबई, पुणेसह राज्यातील २९ महापालिका निवडणुकीची घोषणा करण्यात आली.
येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जांगासाठी ही निवडणूक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवड मध्ये स्वबळाचा नारा दिला.
यातच आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यास तयार आहेत मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून काही अटी घातल्या असल्याची माहिती मिळत आहे. शहरातील अजित पवार राष्ट्रवादीचे निवडणूक प्रमुख नाना काटे आणि शरद पवार राष्ट्रवादीच्या निवडणूक कोअर कमिटीचे सदस्य सुनील गव्हाणे या दोघांची बैठक पार पडली.
Summery
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यास तयार, मात्र काही अटी
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून काही अटी
'दोघांनी एकत्र लढण्यासाठी आम्हीही सकारात्मक'