महाराष्ट्र

नंग्या तलवारी घेऊन बिल्डर आले आमने सामने

Published by : Lokshahi News

महेंद्र वानखडे | दहिसरमध्ये नंग्या तलवारी घेऊन दोन बिल्डरांमध्ये तुफान राडा झाला. जमिनीच्या वादातून हा राडा असून यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. दिवसाढवळ्या ही घटना घडल्याने कायदा सुव्यवस्था आहे की नाही ? अस सवाल उपस्थित होत आहे.

दहिसरमध्ये दिवसाढवळ्या १० पेक्षा अधिक जण तलवार घेऊन रस्त्यावर उतरले होते. जमिनीच्या वादातून दोन बिल्डरमध्ये झालेल्या राड्यामुळे १० पेक्षा अधिक जण तलवार घेऊन राडा घालत होते. या राड्यात पाच जण गंभीर जखमी झाले असून यात दोन वकिलांचा समावेश आहे. त्याच्यावर बोरिवलीच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान १० पेक्षा अधिक जण दिवसाढवळ्या तलवार घेऊन दंगा करताना दिसत आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था आहे की नाही ? तलवार घेऊन येऊन मारहाण करण्याइतकी हिम्मत होतेच कशी..? असा सवाल उपस्थित होत आहे. या घटनेवर पोलिसांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यावर बोलण्यास नकार दिला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."