Bandra Team Lokshahi
महाराष्ट्र

वांद्रे येथे दुमजली इमारत कोसळली; एकाचा मृत्यू तर 16 जखमी

आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : मुंबईच्या वांद्रे परिसरात मध्यरात्री दुमजली इमारत (House Collapse) कोसळली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून 16 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. तर, आणखी तीन ते चार जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची माहिती आहे. शहानवाज (वय 40) या व्यक्तीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

मुंबईतील वांद्रे येथे शास्त्रीनगर परिसरामध्ये मध्यरात्री 12.30 च्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ बचाव पथक, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या, पोलीस, 1 रुग्णवाहिका आणि महापालिकेचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं.

मध्यरात्री 12 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास वांद्रे येथील शास्त्रीनगर भागांत तीन मजली इमारत कोसळली. तळमजल्यावरील सर्व नागरिक सुखरूप असून पहिल्या मजल्यावर 6 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे, तर दुसऱ्या मजल्यावरील 17 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. या 17 जणांपैकी घटनेदरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर इतर 16 लोकांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे.

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकूण 23 जणांची सुटका करण्यात आली आहे. मात्र, बचावकार्य अद्याप सुरुच आहे. अजुनही काही लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. वांद्रे येथील शास्त्रीनगर भागात उत्तर प्रदेश, बिहारमधून कामाच्या शोधात मुंबई शहरात आलेल्या मजुरांची मोठी वस्ती आहे

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nashik Building Collapsed : नाशिकमध्ये इमारत कोसळली, सहा ते सातजण जखमी

Latest Marathi News Update live : जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना रोजगारात नवीन प्रश्न निर्माण होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य