महाराष्ट्र

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या पत्राने खळबळ

Published by : Lokshahi News

केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून तक्रार केली आहे.महामार्गाच्या कामांमध्ये शिवसेना कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी अडथळे आणत आहेत.त्याबाबत उद्धव ठाकरेंकडे दखल घेण्याची विनंती केली आहे.

राज्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गात ठिकठिकाणी नियमबाह्य कामांसाठी अधिकारी आणि कंत्राटदाराना त्रास दिला जात आहे.त्यामुळे काम बंद असल्याबद्दल तीव्र संताप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रात व्यक्त केला आहे.अशीच परिस्थिती कायम राहिली तर कामे सुरू ठेवावीत का?याचा विचार आपला विभाग करत आहे अशी स्पष्ट भूमिका गडकरी यांनी पत्राद्वारे मांडली आहे.कामात अडथळे आणणारी अशी परिस्थिती कायम राहिली तर यापुढे राज्यातील राष्ट्रीय महामार्गांची कामे मंजूर करण्याबाबात विचार करावा लागेल असा गंभीर इशारा या पत्राद्वारे गडकरी यांनी दिला आहे.

वाशीम शहराचे बायपास रस्त्यांचे काम आणि मालेगाव-रिसोड महामार्गावर पैनगंगा नदीवरील उंच पुलाचे कामे अर्धवट थांबली आहेत,त्याकामात शिवसेना कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप असल्याचा पत्रामध्ये उल्लेख आहे.वाशिम जिल्ह्यातील सेलू बाजार गावातून जाणाऱ्या रस्त्याचे काम शिवसेना कार्यकर्त्यांमुळे थांबले आहे. यामध्ये मशिनरीची जाळपोळ करण्यात आल्याची तक्रार केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात खूप प्रगती कराल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Nashik-Mumbai Highway Accident : नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात! बस चालकाचं नियंत्रण सुटलं अन्...15 ते 20 प्रवासी

Beed Rain : बीडमध्ये पावसाचा हाहाकार! सहा गावांमध्ये 44 जण अडकले, बचाव मोहिमेसाठी...