थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mahapalika Election Prachar) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. सभांचा धडाका सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. आता महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत.
आज संध्याकाळी 5.30 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आता प्रचाराची वेळ संपल्यानंतरही उमेदवारांना प्रचार करता येणार असल्याची माहिती मिळत असून पालिकेने नवी नियमावली जाहीर केली आहे. पालिकेच्या या नव्या नियमावलीवर काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
ॲड. संदेश कोंडविलकर सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी यावर आक्षेप घेतला असून प्रचार कालावधी संपल्यानंतर उमेदवार प्रचार कसा करू शकतो, याचं स्पष्टीकरण मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे मागण्यात आलं आहे. प्रचाराची वेळ आणि तारीख संपल्यानंतर देखील उमेदवार प्रचार कसा काय करू शकतो हा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
Summary
प्रचाराची वेळ संपल्यानंतरही उमेदवारांना प्रचार करता येणार
पालिकेची नवी नियमावली जाहीर
पलिकेच्या नियमावलीवर काँग्रेसचा आक्षेप