महाराष्ट्र

Car catches fire | मुंबईत ‘बर्निंग कार’चा थरार

Published by : Lokshahi News

धावत्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना मुंबई शहरात घडली आहे. आलिशान कार म्हणून ओळख असलेल्या बीएमडब्ल्यू कारने अचानक पेट घेतला. ही घटना मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळील रस्त्यावर घडली आहे. द बर्निंग कारचा थरार मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळून जाणाऱ्या आलिशान कारला अचानक आग लागली. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळू शकलेली नाहीये. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाहीये. गाडीला आग लागल्याचं लक्षात येताच चालकाने गाडी थांबवली आणि तो गाडीतून बाहेर पडला.

ही आग इतकी भीषण होती की, अवघ्या काही क्षणातच संपूर्ण कार जळून खाक झाली आहे. घटनास्थळी तात्काळ वाहतूक पोलिसांनी, अग्निशमन दलाने धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून या घटनेत आगीचे मोठे नुकसान झाले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात