महाराष्ट्र

पिस्तूल, जिवंत काडतुसे बाळगणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

रायगडमधील हरिहरेश्वर किनाऱ्यावर संशयास्पद बोटीनंतर पुण्यातही वेगवेगळ्या ठिकाणी चार पिस्तूलसह सात जिवंत काडतुसे सापडली

Published by : Shweta Shigvan-Kavankar

चंद्रशेखर भांगे | पुणे : रायगडमधील हरिहरेश्वर किनाऱ्यावर संशयास्पद बोट आढळून आली आहे. या बोटीमध्ये शस्त्र सापडली असल्याचेही समोर येत आहे. अशातच आता पुण्यातही वेगवेगळ्या ठिकाणी चार पिस्तूलसह सात जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून पुण्याचही हाय अलर्ट देण्यात आला आहे.

पुणे शहर पोलिसांकडून वेगवेगळ्या ठिकाणी चार पिस्तूलसह सात जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. येरवड्यातून खंडणी विरोधी पथकाने तर कोंढव्यातून कोंढवा पोलिसांनी पिस्तूल जप्त केल्या आहेत. सचिन संभाजी जाधव आणि ऋतिक साठे अशा दोन आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सचिन संभाजी जाधव आणि ऋतिक साठे अशी आरोपींची नावे आहेत. तर, ऋतिक साठे हा खुनाच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहातून नुकताच पॅरोलवर बाहेर सुटला होता. तर सचिन जाधव हा सराईत गुन्हेगार आहे.

दरम्यान, दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या काळात पुण्या-मुंबईत मोठी गर्दी जमते. याचाच फायदा घेत दहशतवाद्यांनी मोठा कट रचला होता, अशी शंका उपस्थित केली गेली. मात्र, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बोट ऑस्ट्रेलियन महिला हाना लाँर्डरगन यांची आहे. सध्या तरी यामध्ये टेरर अँगल दिसून येत नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे. तरी, हाय अलर्ट जेथे द्यावं लागतं तिथे दिलं आहे. सणांचे दिवस आहेत, त्यामुळे अलर्ट राहावं लागेल, असे म्हंटले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा