Bacchu Kadu : शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील प्रहारचं काल अमरावती जिल्ह्यातील अचलपूर टोल नाक्याजवळ चक्काजाम आंदोलन केलं. आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर टायर जाळत तीव्र निषेध व्यक्त केला.
यापूर्वी शेतकरी प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी पदयात्रा, उपोषण केल्यानंतर काल थेट रस्त्यावर उतरत प्रहारने आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनात बच्चू कडू सहभागी झाले होते. याच पार्श्वभूमीवर आता बच्चू कडू यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. काल शेतकऱ्यांची कर्जमाफी यास अन्य मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यात रास्तारोको आंदोलन केलं होतं.
अमरावतीच्या नांदगाव पेठ टोल नाक्यावर बच्चू कडू यांच्यावर आंदोलन केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन, रस्ता अडवणे, विनापरवानगी जमाव जमवणे, सामान्य जनतेच्या प्रवासात अडथळात निर्माण करणे आणि रस्त्यावर टायर जाळल्या प्रकरणी बच्चू कडू यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून नांदगाव पेठ पोलीस स्टेशन सह ग्रामीण भागातील पोलीस स्टेशनमध्ये ही विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. बच्चू कडू यांच्यावर नांदगाव पेठ पोलीस स्टेशन मध्ये 126(2),189(2), आणि 135 महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.