महाराष्ट्र

कर्नाटकातील बसचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी मनसे जिल्हाध्यक्षांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

Published by : Shweta Shigvan-Kavankar

प्रसाद पाताडे | सिंधुदुर्ग : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ एसटी डेपोमध्ये पार्किंग करून ठेवलेल्या कर्नाटक सरकारच्या एसटी बसवर जय महाराष्ट्र मनसे अशा काळ्या स्प्रेने लिहुन त्या बसवर मनसेचे झेंडे बांधले. शासकीय मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी मनसे माजी जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्यासह पाच जणांवर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कर्नाटक रोड ट्रान्सपोर्ट कार्पोरेशन बेळगांव डिव्हिजन डेपो नं. 3 च्या बसचे वाहक मनोज रामा पावले (रा. बेळगांव) यांनी कुडाळ पोलिस स्थानकात याबाबतची फिर्याद दिली आहे.

मनोज रामा पावले यांनी बस चालक नाझिम हसनसाब सरकावर यांच्यासह कर्नाटक डेपोची एसटी बस प्रवाशांसह घेऊन कुडाळ जुने बस स्थानक येथे सायंकाळी 6 वाजता आले होते. सर्व प्रवासी उतरवून 6.30 वाजता हे दोघेही एसटी बससह कुडाळ डेपो येथे गेले. या ठिकाणी एसटी बस पार्किंग करून ठेवत ते विश्रांती कक्षात गेले. यावेळी जय महाराष्ट्र अशा घोषणा देत काही जण बस पार्किंग करून ठेवलेल्या ठिकाणी आले व त्याठिकाणच्या कर्नाटक सरकारच्या बसवर काळ्या रंगाच्या कर्लर स्प्रेने जय महाराष्ट्र मनसे असे लिहिले. व या गाडीवर मनसेचे झेंडे लावून ते निघून गेले.

याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज विश्वनाथ परब (वय 37, रा. गुढीपुर), विष्णु लक्ष्मण मसके (वय 26, रा. पिंगुळी गुढीपुर), सुबोध सुर्यकांत परब (वय 34, रा. केरवडे तर्फ माणगांव), जनार्दन लक्ष्मण घाडी (वय 36, रा. नानेली), प्रथमेश यशवंत धुरी (वय 35, रा. पिंगुळी शेटकरवाडी) यांच्यावर शासकीय मालमत्तेचे विद्रुपीकरण तसेच मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक दळवी करीत आहेत, अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली. दरम्यान, कुडाळमध्ये बुधवारी दिवसभरात आलेल्या बस पोलीस सुरक्षेसह त्या-त्या तालुक्यांच्या हद्दीत सोडण्यात आल्या आहेत. दिवसभरात कोणतेही इतर वादग्रस्त घटना या अनुषंगाने घडली नसल्याची माहिती कुडाळ पोलिसांनी दिली आहे.

Rajendra Gavit : शिंदे गटाला धक्का! राजेंद्र गावित यांचा भाजपात प्रवेश

MI VS SRH: सुर्यकुमार यादवचे नाबाद शतक! हैदराबादचे 7 गडी राखून केला पराभव

Madha Lok sabha Election 2024 : माढ्यात आचारसंहितेचा भंग, मतदान केंद्रात मोबाईल कॅमेऱ्याचा वापर

Baramati : सुप्रिया सुळेंची दत्तात्रय भरणेंविरोधात तक्रार दाखल, निवडणूक आयोग कारवाई करणार का?

आमदार भरणेंनी शिवीगाळ केलेला व्हिडिओ रोहित पवारांनी केला ट्विट