Amit Shah  Team Lokshahi
महाराष्ट्र

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील मृत श्री सदस्यांना अमित शाहांनी अर्पण केली श्रध्दांजली; म्हणाले, माझे मन जड...

मराठीत ट्वीट करत केंद्रीय मंत्री अमित शाहांनी ही श्रध्दांजली अर्पण केली.

Published by : Sagar Pradhan

काल नवी मुंबईमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते ज्येष्ठ निरुपणकार आणि पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. परंतु, या सोहळ्यात एक दुर्देवी घटना घडली. या सोहळ्यासाठी लाखो श्री सदस्य सहभागी झाले होते. मात्र, उष्माघात झाल्याने तब्बल ११ जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असताना आता केंद्रीय मंत्री अमित शाहा यांनी ट्वीट करत भावना व्यक्त केल्या आहेत.

नेमकं काय केले अमित शाहांनी ट्वीट?

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात मृत्यू झालेल्या श्री सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करताना अमित शाह म्हणाले की, काल झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला उपस्थित असताना उष्माघाताने प्राण गमावलेल्या श्रीसदस्यांच्या जाण्याने, “माझे मन जड झाले आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जे लोक उपचार घेत आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो.” असे मराठीत ट्वीट करत त्यांनी श्रध्दांजली अर्पण केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा