महाराष्ट्र

लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! तिन्हीही मार्गांवर काय स्थिती?

मुंबईसह उपनगरांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. यामुळे लोकल पूर्णपणे विस्कळीत झाल्या होत्या. यामुळे चाकरमान्यांचे नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यभरात मुसळधार पावासाने हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. यामुळे लोकल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाल्या होत्या. चाकरमान्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. परंतु, मध्ये रेल्वेने आता मोठी बातमी दिली आहे. मध्य रेल्वे मार्गासह हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल पूर्ववत झाल्या आहेत.

मुंबईसह उपनगरांत सकाळपासून पावसाची जोरदार बॅटींग सुरु आहे. यामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचून रेल्वे सेवा विस्कळीत झाल्या होत्या. परंतु, आता लोकल सेवा पूर्वतत झाल्या आहेत.

या लोकलचे मार्ग झाले पूर्ववत

कल्याण-कसारा विभाग

अंबरनाथ-बदलापूर अप-डाऊन विभाग

सीएसएमटी ते अंबरनाथ सेक्शन आणि बदलापूर ते कर्जत सेक्शन सुरू

सीएसएसटी ते कल्याण, कर्जत, खोपोली, कसारा

सीएसएसटी ते पनवेल, गोरेगाव

ठाणे ते वाशी, पनवेल

बेलापूर, नेरूळ-खारकोपर

दरम्यान, राज्यात पुढील पाच दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील तीन दिवस मुंबईतील जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मराठवाडा वगळता विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणातील अनेक जिल्ह्यात आज आणि उद्या अतिमुसळधार पाऊस कायम राहणार आहे. तर, आज पुणे, रायगड, पालघर, सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं