महाराष्ट्र

भारतरत्न डॉ बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर रांगा

Published by : Lokshahi News

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी 6 डिसेंबर रोजी दादर चैत्यभूमी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी दाखल झाले आहेत. रविवारी मध्यरात्रीपासून शेकडो आंबेडकरी अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी रांगा लावल्या आहेत. गर्दी होऊ नये तसेच कोरोना बाबतचे नियम पाळले जावेत म्हणून इथे मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील कोव्हिडचे संकट असल्याने प्रशासनाने गर्दी न कोव्हिड बाबत सुरक्षेचे उपाय योजना करण्याचे आवाहन केले होते. तरी देखील शेकडो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त 8 उपनगरीय विशेष गाड्या

आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त 8 उपनगरीय विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.मुंबई विभाग मेन लाईनवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कल्याण विभाग आणि हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पनवेल या दोन्ही उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक होणार नाही, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.

"देशभक्त शब्दावर आक्षेप घेणारे फडणवीस देशद्रोही आहेत"; उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार

Shivsena UBT : ठाकरे गट -भाजप कार्यकर्ते भिडले, कोटे समर्थकांनी पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप

"मोदींनी काँग्रेसचा कलंक संपवून अयोध्येत राम मंदिर उभारलं"; उत्तर प्रदेशचे CM योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Manoj Jarange Patil : 4 तारखेला उपोषण करणार म्हणजे करणार

स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण; अरविंद केजरीवाल यांच्या पीएला अटक