Wardha
Wardha Team Lokshahi
महाराष्ट्र

वर्ध्यातील नागपूर-अमरावती महामार्गावर चक्काजाम आंदोलन

Published by : shamal ghanekar

भूपेश बारंगे | वर्धा : वर्ध्यातील नागपूर अमरावती महामार्गावर आज हेटीकुंडी फाट्यावर नागरिकांच्या न्यायासाठी काँग्रेसच्या माजी आमदार अमर काळे यांच्या उपस्थितीत चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे.

कारंजा (घाडगे) तालुक्यातील बोर अभयारण्य जंगल भागाला लागून असलेल्या गावाशेजारी वाघाची दहशत पसरली आहे. काही वर्षात या परिसरात 7 जणांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. तर आष्टी तालुक्यात 5 जणांचा मृत्यू झाला. 399 जनावरांचा मृत्यू झाल्याची नोंद वनविभागाकडे आहे.वाघाच्या वाढत्या हल्ल्यामुळे नागरिक दहशीत आहे. यामुळे या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरित सामावून घावे. मृतकाच्या कुटुंबाला 20 लाख रुपये हे तुटपुंज्या असून 50 लाखाची मदत देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

जवळपास एका तासापासून सुरू असलेल्या चक्काजाम आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिकासह शेतकरी उपस्थित झाले आहे. या आंदोलनात दोन्हीबाजूने वाहनाच्या रांगाच रांगा लागल्या आहे. या आंदोलनात काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते, शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहे. या आंदोलनाला वनविभागाचे अधिकारी यांनी भेट दिली आहे. गांधी जयंतीदिनी आंदोलन सुरू केले असून शांत पणाने आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांची मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Wardha

महामार्गावर वाहनांची रांगाच रांगा

नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग सहावर कारंजा तालुक्यातील हेटीकुंडी फाट्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्ग अडविल्याने दोन्ही बाजूने वाहनाच्या रांगाच रांगा लागल्यानं असून जवळपास 10 किलोमीटर अंतरापर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या आहे.

"४ जूनला आमचं सरकार दिल्लीत बसणार म्हणजे बसणार"; रत्नागिरी-चिपळूणमध्ये आदित्य ठाकरेंनी पेटवली 'मशाल'

सरकारनं कांद्यावरील निर्यातबंदी हटवली; बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Yamini Jadhav : प्रचाराला कमी दिवस असले तरी आम्ही महायुतीच्या उमेदवाराच्या दृष्टीकोनातून लोकांपर्यंत पोहचलेलो आहोत

सोशल मीडियावर लक्ष ठेवण्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या सूचना

सरकारनं कांद्यावरील निर्यातबंदी हटवली; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...