महाराष्ट्र

“…म्हणून सतेज पाटील आणि धनंजय महाडिक एकत्र येत नाही”

Published by : Lokshahi News

देशांच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी जगभरातील सर्वच देश संरक्षणावर कोट्यवधी रुपये खर्च करत असतात. मात्र आपल्या देशाची जागा असून सुद्धा दुसऱ्या देशाची जागा कशाला लागते, असे म्हणत जगात सुद्धा अशा अनेक शक्ती आहेत. ज्यांना सगळे देश सुखाने नांदावेत असे वाटत नसल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

राजकारणात सुद्धा हेच सुरू असल्याचे म्हणत आणि याचाच धागा पकडत भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्याबाबत हेच झालं आहे, असे म्हटले. या दोघांना जरी मी कोणताही स्वार्थ न ठेवता एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केला, तर काहीजण ते एकत्र येऊ नयेत यासाठी प्रयत्न करत असतात, असे म्हटले आहे. हे दोन गट एकत्र आले तर आपलं घर कसे चालणार म्हणत अनेकजण प्रयत्न करत असतात, असेही यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले.

महायुतीसह मविआमध्ये उमेदवारी अर्जासाठी लगबग

Shrikant Shinde: "राज ठाकरेंचे विचार हे शिवसेनेचे विचार"

काँग्रेसमध्ये नाराज असलेले काँग्रेस नेते आबा बागुल आजपासून रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारात सक्रिय

Sanjay Raut : फडणवीस लवंगी फटाक्याइतकाही स्फोट करु शकत नाहीत

Sanjay Raut : निवडणूक आयोगावर किती विश्वास ठेवायचा ?