Chandrakant Patil team lokshahi
महाराष्ट्र

Chandrkant Patil : “फटके खाल्ल्याशिवाय त्यांना शहाणपण शिकता येत नसेल तर…” चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

Published by : Shweta Chavan-Zagade

शनिवारी पहाटे चारच्या सुमारास राज्यसभा निवडणुकीचा (Rajya Sabha Election) निकाल लागला आहे. यामध्ये महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि भाजपचे प्रत्येकी तीन उमेदवार निवडून आले आहे. राज्यसभा निवडणुकीच्या या निकालानंतर आता राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे.

“गेल्या २४ वर्षात महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुका झाल्या नाहीत. आमच्याकडे भाजपाची ३० मते आहेत, त्यामुळे तुम्ही कशासाठी हट्ट धरता. भाजप तिसरी जागा जिंकणारच होती. त्यामुळे अर्ज मागे घेण्याच्या दिवशी आम्ही त्यांच्याकडे आग्रह धरला की, हा हट्ट करू नका. विधान परिषदेला पाचवी जागा जिंकता येते तरीसुद्धा बिनविरोध होऊ, असंही आम्ही सांगितलं होतं. पण त्यांनी ऐकलं नाही.”

देवेंद्र फडणवीस हे असं रसायन आहे की, त्यांच्या डोक्यात काय चाललंय हे माझ्यासारख्या सहकारी कार्यकर्त्याला देखील कळणं अवघड आहे. आमचा त्यांच्यावर खूप विश्वास आहे. ते जे सांगतील तेवढंच काम आम्ही करतो. संजय राऊतांपेक्षा आमच्या उमेदवाराला किमान अर्धा मत अधिक मिळेल, हे देंवेद्र फडणीवासांनी लक्ष्य ठेवलं होतं. त्याप्रमाणे नियोजन करत त्यांनी सहावा उमेदवार विजयी केला. त्यानुसार धनंजय महाडिकांना संजय राऊतांपेक्षा अर्धा मत (४१.५६ मते) अधिक मिळाला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा