महाराष्ट्र

महाराष्ट्रातील जिल्ह्यांची नावे बदलून फक्त डिवचण्याचे काम : अबू आजमी 

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अभिजीत हिरे | भिवंडी : महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी फक्त अहमदनगर, औरंगाबाद, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांची नावे मुस्लिम म्हणून ती बदलण्याचा घाट शासनाने घातला जात आहे. फक्त नाव बदलल्याने राज्याचा आर्थिक विकास साधणार नाही. नोकऱ्या वाढणार नाहीत, असे समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार अबू आजमी यांनी दिली आहे. भिवंडीत आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

फोनवरुन मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीबाबत अबू आजमी यांनी विचारले असता ते म्हणाले, मी सत्याच्या बाजूने असून संविधानाने दिलेल्या अधिकारात राहून मी बोलत असल्यामुळे मला कोणाची भीती नाही आणि मी अशा चिरकुट लोकांनी दिलेल्या धमक्यांना घाबरत नाही, अशी प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आजमी  यांनी त्यांना आलेल्या धमकीच्या दूरध्वनी बाबत विचारलेल्या प्रश्नावर भिवंडीत पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

औरंगजेब हा हिंदुद्वेष्टा राजा नव्हता हे सांगत बनारस येथील एक प्रसंग सांगत अनेक मंदिरांना संरक्षण देत दान दिले होते याची आठवण करून दिली. जुन्या शहरांची नावे बद्दलण्यापेक्षा नवी शहरे बनवा त्याला हवे त्यांचे नाव द्या. बाळासाहेब ठाकरे व त्यांची पत्नी आता काही दिवसांनी नरेंद्र मोदी यांचे नाव द्या. आम्हाला काही ही हरकत नाही, अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली आहे.

औरंगजेब, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची लढाई धर्मासाठी नव्हे तर सत्तेसाठी, राज्यासाठी असायची. त्यावर कोणीही उठतो काहीही बोलतो हे चुकीचे आहे. टिपू सुलतान यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला. त्यांच्या विरोधात अपशब्द बोलल्यावर आम्ही त्याचा विरोध केला तर आम्हाला धमक्या येतात त्या खपवून घेणार नाही, असे त्यांनी निक्षून सांगितले. 

देवी-देवता, राष्ट्रपुरुष, धर्मावर चुकीचे बरळणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्याची गरज आहे. त्यांच्यावर अतिरेकी कायद्यावर कारवाई करीत पाच वर्षे कारागृहात टाकाल्यामुळे महाराष्ट्रातील 80 टक्के कायदा सुव्यवस्था सुधारेल. पण, कायदा बनविणारे या गोष्टी घडवून आणतात. ज्यामुळे देशातील हिंदू-मुस्लिम यांच्यात लढाई होईल, असे वातावरण बनविले जाते, अशी टीकाही अबू आजमी यांनी केली आहे.

पुण्यातील रेसकोर्स मैदानात PM मोदींचं मोठं विधान, म्हणाले; "देशाच्या पहिल्या बुलेट ट्रेनमध्ये..."

शरद पवारांनी PM मोदींसह अमित शहांवर फुंकली 'तुतारी', म्हणाले; "जो महागाई वाढवतो, त्यांना..."

Harbour Railway: तब्बल ४ तासांनंतर हार्बर रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर

पंतप्रधान मोदींचा इंडिया आघाडीला थेट इशारा, साताऱ्यात म्हणाले, "मी जिवंत आहे, तोपर्यंत..."

IPL मध्ये जॅक्सने दाखवली 'विल'पॉवर! ख्रिस गेलचा दहा वर्षांपूर्वीचा 'हा' विक्रम मोडला