थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Panvel) 29 महानगरपालिकांमध्ये मतदान आज होणार आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून असून संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी–चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली–मिरज–कुपवाड, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड–वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर, उल्हासनगर, कल्याण–डोंबिवली, भिवंडी–निजामपूर, मीरा–भाईंदर, वसई–विरार, पनवेल या 29 महानगरपालिकांमध्ये मतदान आज होणार आहे.
मतदानाला सुरूवात झाली असून पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 19 मध्ये मतदान केंद्रावर गोंधळ झाल्याचे पाहायला मिळत असून भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार भांडण झाले आहे. दुबार मतदार असल्याचं म्हणत मतदाराला लॉकअप मध्ये टाका असं म्हणणाऱ्या व्यक्तीवर भाजपचे कार्यकर्ते चिडल्याचे पाहायला मिळत आहे. प्रभाग क्रमांक 19 मधील गुजराती शाळा मधील मतदान केंद्रावर हा गोंधळ झाला असून पोलिसांकडून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना समज देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
Summary
पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 19 मध्ये मतदान केंद्रावर गोंधळ
भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार भांडण
दुबार मतदार असल्याचं म्हणत मतदाराला लॉकअप मध्ये टाका असं म्हणणाऱ्या व्यक्तीवर भाजपचे कार्यकर्ते चिडले