Chhatrapati sambhajinagar 
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव कारने दोघांना चिरडलं; कार चालक ताब्यात

नंद्राबाद गावाजवळील छत्रपती संभाजीनगर-खुलताबाद रस्त्यावर एका भीषण अपघातात पायी चालणाऱ्या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.

Published by : Team Lokshahi

( Chhatrapati Sambhajinagar ) नंद्राबाद गावाजवळील छत्रपती संभाजीनगर-खुलताबाद रस्त्यावर एका भीषण अपघातात पायी चालणाऱ्या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी (३ ऑगस्ट) सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात घडला असून, मृतांमध्ये ज्ञानेश्वर राधाकृष्ण जाधव (वय ३४) व अशोक यादव घुसळे (वय ५५, दोघेही रा. नंद्राबाद) यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनोजकुमार मारूती काटकर हे आपल्या पत्नीसह कारने खुलताबादहून वेरूळकडे जात होते. पायी जात असताना शेतातून परत येणाऱ्या ज्ञानेश्वर जाधव आणि अशोक घुसळे यांना भरधाव वेगात आलेल्या कारने जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

या अपघातानंतर चालकाने गाडी घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी म्हैसमाळ रोडवर चालकाला कारसह ताब्यात घेतले. यानंतर खुलताबाद पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय फराटे, बीट जमादार शेख जाकीर, पो.कॉ. सिद्धार्थ सदावर्ते यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून मृतदेह खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात हलवला. सकाळी 11 वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृतदेहांचे पंचनामे पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

या घटनेत त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण नंद्राबाद गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा