थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Chhatrapati Sambhajinagar) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. 30 डिसेंबरपर्यंत महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार होते.
आज 31 डिसेंबर रोजी उमेदवारांच्या अर्जाची छाननी होणार आहे. तर 2 जानेवारी 2026 पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. यातच काल अनेकांना उमेदवारी नाकारल्याने इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली. उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर अनेक ठिकाणी गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले.
याच पार्श्वभूमीवर उमेदवारी दिली नसल्याने भाजप कार्यालयात नाराज महिला उपोषणाला बसल्या आहेत. वर्षा साळुंखे, दिव्या मराठे या भाजपच्या पदाधिकारी उपोषणाला बसल्या असून काल रात्रीपासून भाजपच्या महिला कार्यकर्त्या उपोषणाला बसल्या आहेत.
Summery
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक
उमेदवारी न मिळाल्याने महिला कार्यकर्त्यांचं उपोषण
वर्षा साळुंखे,दिव्या मराठेंचं भाजप कार्यालयात उपोषण