थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Devendra Fadnavis)आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अनेक बैठका घेतल्या जात असून प्रचार सभांना सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्र्यंबकेश्वर आणि जळगाव दौऱ्यावर असणार आहेत.
आजपासून नगरपरिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभा होणार आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांना जोर वाढल्याचे पाहायला मिळत असून मुख्यमंत्र्यांच्या आज चार सभा होणार आहे.
त्र्यंबकेश्वर, शाहदा, कोपरगाव, भुसावळ या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीसांच्या या सभा होणार असून या सभांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सभेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summery
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांना जोर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज त्रंबकेश्वर आणि जळगाव दौऱ्यावर
आजपासून नगरपरिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभा