थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली Scoll करा...
(Devendra Fadnavis ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर असणार आहेत.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने होणाऱ्या विविध प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकमध्ये असणार असून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने होणाऱ्या विविध प्रकल्पांच्या उद्घाटन असणार आहे. या प्रकल्पावरुन वाद निर्माण झालेला पाहायला मिळत आहे.
नाशिकच्या टाकळी परिसरामध्ये मलनिःसारण केंद्र उभारण्यात येणार आहे. मात्र याला स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. नासरडी नदीवर हा प्रकल्प उभा केला जाणार आहे. मात्र या नदीचे पावित्र्य या प्रकल्पामुळे धोक्यात येणार या प्रकल्पासाठी नाल्यांचे पाणी पाईपलाईनद्वारे घेऊन जाण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
त्यामुळे नागरिक या प्रकल्पाला विरोध करत मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Summery
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकमध्ये
टाकळीतील प्रकल्पाला विरोध
स्थानिक नागरिक मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याच्या तयारीत