थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Devendra Fadnavis) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. 30 डिसेंबरपर्यंत महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार होते. काल 31 डिसेंबरला उमेदवारांच्या अर्जाची छाननी करण्यात आली. काल अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.
29 महापालिकांची निवडणूक अर्ज मागे घेण्याची मुदत आता संपली असून आज निवडणूक चिन्हं आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर केली जाणार आहे. आजपासून उमेदवारांच्या प्रचार फेरी, सभांना सुरुवात होईल. अनेक ठिकाणी स्थानिक नेते आणि प्रमुख नेत्यांच्या सभा होतील.
याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालिकेच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सांगलीत पहिली जाहीर सभा होणार आहे. इचलकरंजीत रोड शोचं आयोजन करण्यात आले असून संध्याकाळी वरळीच्या NSCI डोममध्ये मेळावा घेण्यात येणार आहे. आमदार राहुल आवाडे यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले असून आज दुपारी 2 वाजता मुख्य मार्गावर रोड शो होणार आहे. महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी फडणवीसांचा दौरा असणार आहे.
Summary
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पालिकेच्या प्रचाराचा नारळ फोडणार
आज सांगलीत मुख्यमंत्र्यांची पहिली जाहीर सभा
इचलकरंजीत रोड शोचं आयोजन