थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Sanjay Raut) संजय राऊत आता पुन्हा मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहेत. खासदार संजय राऊत प्रकृतीच्या कारणास्तव गर्दीपासून दूर होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर संजय राऊत यांनी सार्वजनिक जीवनातून काही महिने दूर राहणार असल्याचे जाहीर केले होते.
मात्र आता संजय राऊत पुन्हा सक्रिय झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची भेट झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांची एका खासगी कार्यक्रमात भेट घेतली असून मुख्यमंत्र्यांनी राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची एका विवाह सोहळ्यात भेट झाली असून राजेश नार्वेकर यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात फडणवीस-राऊत यांची भेट झाली.
Summery
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची एका विवाह सोहळ्यात भेट
मात्र दोन्ही नेत्यांमध्ये कुठलीही चर्चा नाही
राजेश नार्वेकर यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात झाली फडणवीस-राऊत यांची भेट