महाराष्ट्र

एकदम ओक्के! मुख्यमंत्री शिंदे व राजू शेट्टी झळकले एकत्र बॅनरवर; चर्चांना उधाण

शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राजू शेट्टी यांचे एकत्रित बॅनर लावले. हे बॅनर झळकाताच तालुक्यात एकच चर्चा सुरु आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

संजय देसाई | सांगली : जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील रेठरे हरणाक्ष येथील एका शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहनपर अनुदान जमा झाले. यानंतर या शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राजू शेट्टी यांचे एकत्रित बॅनर लावले आहेत. तर, एकदम ओके, पन्नास हजार रुपये मिळाले जाहीर आभार, असा मजकूर या बॅनर लिहीण्यात आला आहे. हे बॅनर झळकाताच तालुक्यात एकच चर्चा सुरु आहे.

तत्कालिन महाविकास आघाडीचे सरकार असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रेग्युलर कर्जधारकांना पन्नास हजार रुपयांची प्रोत्साहन देण्याचे कबूल केलं होतं. सरकार जात असताना घाई गडबडीत याची घोषणाही करण्यात आली होती. पण, ती फक्त घोषणाच राहीली. याविरोधात राजू शेट्टी यांनी सप्टेंबर २०२० साली परिक्रमा पंचगंगेची यात्रा केली. ही यात्रा प्रयाग चिखली ते नरसिंहवाडी ही दीडशे किलोमीटर अंतराची पायी यात्रा काढून सुध्दा सरकार दखल घेत नव्हते. त्यावेळी महाविकास आघाडीच्या सरकारने १५० रूपये प्रती गुंठा देऊन पुरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळले होते.

त्यानंतर १३ जुलै २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूरवर भर पावसाळात मोर्चा काढण्यात आला. याची शिंदे सरकारने दखल घेत दिवाळीपुर्वी अनुदान जमा करण्याचे आश्वासन दिले होतं. कालपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान जमा झाले आहे. यामुळे राजू शेट्टी यांच्या लढ्याला यश आले आहे, अशी चर्चा या बॅनरमुळे तालुक्यात सुरू आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा