Shiv Sena | eknath shinde team lokshahi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला मराठा आरक्षणाचा शब्द

मराठा क्रांती मोर्चा शिष्टमंडळाकडून मागण्यांचे Eknath Shinde यांना निवेदन

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक विनोद पाटील (Vinod Patil) यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी मराठा आरक्षण प्रश्न लवकरच मार्गी लागण्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला, अशी माहिती विनोद पाटील यांनी दिली आहे.

मराठा समाजाला ओबीसीतून मराठा आरक्षण मिळावे, सारथी व अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळातील कल्याणकारी योजना गतीमान कराव्यात, जाचक अटी रद्द करून कामकाजात पारदर्शकता आणावी यासह विविध मागण्यांकडे नवीन सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक विनोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुंबईत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षण प्रश्न लवकरच मार्गी लागण्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला असल्याची माहिती विनोद पाटील यांनी दिली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात