महाराष्ट्र

Ashadhi Wari 2022 : आषाढीची लगबग; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज महापूजेसाठी पंढरपूरमध्ये

Ashadhi Wari 2022 : आषाढी यात्रेसाठी पंढरी सजली असून आज पालख्यांचं पंढरपुरात आगमन होणार आहे. कोरोनामुळे 2 वर्षांनंतर पायी चालत वारकरी पंढरपुरात दाखल होत असल्यानं वारकऱ्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे.

Published by : Shweta Chavan-Zagade

Ashadhi Wari 2022 : आषाढी एकादशीला अवघा एक दिवस बाकी आहे. पंढरपूरच्या जवळ येताच वारकऱ्यांना विठुरायाच्या भेटीची आस लागते आणि त्यांची पावलं पंढरपुराकडे ओढली जाऊ लागतात. आज पालखी पंढरपुरात दाखल होणार आहे. याचदरम्यान आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यासाठी शनिवारी (ता. ९) रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde ) यांचे पंढरपुरात आगमन होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे पंढरपूर दौऱ्यावर येणार असल्याने प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. अनेक आमदार आणि कार्यकर्त्यांकडून शहरातील प्रमुख रस्त्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे जागोजागी फलक लावण्यात आले आहेत. आषाढी एकादशीची श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर कार्तिकी एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्याची प्रथा सुरु आहे.

या प्रथेनुसार मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे महापूजा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शनिवारी रात्री पुण्याहून पंढरपूर येथे आगमन होईल. रविवारी पहाटे २.३० ते ४.३० वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा होईल.

दोन वर्षानंतर होत असलेली आषाढी यात्रा विक्रमी होत असून काल नवमीपर्यंत शहरात जवळपास 7 लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल झाले होते. एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या निवासाचा प्रश्न कायमच गंभीर असतो. मात्र, काही वर्षांपासून प्रशासनाने चंद्रभागेशेजारी असणाऱ्या 65 एकर जागेवर भक्तिसागर हे निवास क्षेत्र विकसित केले आहे. यंदा रेल्वेच्या ताब्यात असलेले 40 एकराचे क्षेत्र देखील प्रशासनाला मिळाल्याने यंदा 105 एकर जागेत तब्बल 5 लाख भाविकांच्या मोफत निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी