थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Devendra Fadnavis) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुस्तकाचे आज प्रकाशन होणार आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांची उपस्थिती असणार आहे.
यासोबतच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सभापती राम शिंदे आणि इतर नेतेही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असून लोकभवन येथे आज सायंकाळी हा पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडणार आहे.
Summery
मुख्यमंत्री फडणवीसांच्या पुस्तकाचं आज प्रकाशन
राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते प्रकाशन
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचीही असणार प्रमुख उपस्थिती