Child Trafficking
Child Trafficking 
महाराष्ट्र

रत्नागिरीत नवजात बालकांची तस्करी करणारे रॅकेट सक्रीय; जाणून घ्या प्रकरण काय ?

Published by : left

निसार शेख, रत्नागिरी | रत्नागिरी जिल्ह्यात (Ratnagiri) नवजात बालकांची खुलेआम विक्री (child Trafficking) होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिला होमगार्डच्या मध्यस्थीने मुलाची विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित प्रकार हा हिंदूत्ववादी संघटनांमुळे चव्हाट्यावर आला आहे. या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी रत्नागिरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात नवजात बालकांची खुलेआम विक्री (child Trafficking) करणारे रॅकेट सक्रीय झाले आहे. हे रॅकेट आर्थिकदृष्ट्या परिस्थिती खालावलेल्या कुटूंबाला टार्गेट करते. 14 एप्रिल रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात एक महिला प्रसूतीसाठी दाखल झाली होती. या महिलेने 16 एप्रिलला एका मुलाला जन्म दिला होता. या प्रसुतीनंतर त्याच दिवशी या महिलेला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते.

मात्र महिलेने जन्म दिलेल्या बाळाला विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका होमगार्ड महिलेच्या मध्यस्थीने या मुलाची विक्री झाल्याची माहिती आहे. यात 1 लाख 20  हजाराला या नवजात मुलाच्या विक्रीचा व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. हिंदूत्ववादी संघटनांमुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे.

Daily Horoscope 4 May 2024 Rashi Bhavishya: 'या' राशींच्या लोकांचे वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस ; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 4 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

'आमचं सरकार आलं तर 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवू' राहुल गांधींची मोठी घोषणा

Garlic: उन्हाळ्यात 'या' लोकांनी लसूण खाणे टाळावे

Cold Water: माठातील पाणी फ्रिजसारखं गार कसं करायचं? जाणून घ्या...