महाराष्ट्र

चिपळूणात दरड, पूल कोसळल्यामुळे वाहतुकीत बदल

Published by : Lokshahi News

निसार शेख । चिपळूण जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे असंख्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच अनेक भागात दरड कोसळल्याच्या व पूल वाहून गेल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे वाहतुकीसाठी जिल्ह्यातील नेमके कोणते रस्ते सुरू आहेत याची माहिती आता जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील कळकवणे-आकले-तिवरे रस्ता (प्राजिमा 26) कि.मी. 0/7 वरील पूल वाहून गेल्यामुळे व दरड कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूक सध्या बंद आहे. या मार्गावरील पूल वाहून गेल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूल होईपर्यंत पिंपळी नाका ते पेढांबे नाका ते खडपोली व वालोटी आकले या पर्यायी मार्गावरुन वळविण्यात आली आहे. तसेच पिंपळी-नांदीवसे रस्ता (प्राजिमा 23) या मार्गावरील पूल वाहून गेल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पिंपळी नाका ते पेढांबे नाका-खडपोली ते ओवळी नाका – ओवळी गाव – ओवळी तळीवाडी मार्गे नांदीवसे-गणेशपूर या पर्यायी मार्गावरुन वळविण्यात आली आहे.

कादवड-कोंडावळे ते तिवडी गावठण-मोरेवाडी या रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे व रस्ता खचल्यामुळे हा मार्ग बंद आहे.  या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरु करण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयाकडून प्रयत्न सुरु आहेत. लवकरात लवकर हा मार्ग सुरु करण्याचा या विभागाचा प्रयत्न आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

"मोदी तुम्ही माझ्याशी लढा, माझ्या आई-वडीलांचा अपमान केला, तर..."; उद्धव ठाकरेंनी PM मोदींना दिला इशारा

Dora Cake Recipe: मुलांच्या आवडीचा ‘चॉकलेट डोरा केक’ बनवा घरच्याघरी, जाणून घ्या रेसिपी...

Akshay Tritiya 2024: अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

टी-२० वर्ल्डकप सुरु होण्याआधी युवराज सिंगचं मोठं विधान, म्हणाला; "विराट कोहली वर्ल्डकप मेडल..."

Daily Horoscope 10 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना अक्षय तृतीयाचा दिवस शुभ; पाहा तुमचे भविष्य