समीर महाडेश्वर | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाला केंद्र सरकारची लवकरच परवानगी मिळणार आहे. येत्या महिन्याभरात चिपीविमानतळाचे उद्घाटन ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपीविमानतळाला केंद्र सरकारची लवकरच परवानगी देण्यात येईल. अशी ग्वाही केंद्रीय हवाई वाहतुक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांना मंगळवारी येथे दिली. त्यामुळे विमानतळाला केंद्रसरकारची परवानगी मिळाण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. येत्या महिन्याभरात चिपीविमानतळाचे उद्घाटन ज्योतिरादित्य सिंदिया आणि नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. नारायण राणे यांनीच ही माहिती दिली आहे.